
लोहा तालुक्यातील येळी येथील कै. गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय, येळी ता. लोहा जि. नांदेड येथे दि. 20जून 2026 रोज शनिवारी माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या गुणवंत विध्यार्थी आणि भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश मोहनराव पाटील सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेतून प्रथम कु. गंगासागर ढगे (80.40%) द्वितीय कु. किर्ती ढगे (79.60%) तृत्तीय कु. प्रणिता ढगे (77.80%) हिने मिळवला. तर शाळेचा माजी विध्यार्थी कामाजी तिरुपती ढगे याची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश पाटील सिरसाट, श्री आनंदराव हंबर्डे सर, शिवाजी आडकिने सर, अमोल वाघमारे सर, सौ. केंद्रे मॅड्डम, सचिन वर्ताळे सर, गावातील तिरुपती पाटील ढगे, दत्ता पाटील ढगे, लोकडेश्वर ढगे, शेख बाबू सह शाळेतील सर्व विध्यार्थी उपस्थित होते.



