
नांदेड, :
जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील प्रगत रेशीम उत्पादक शेतकरी रामचंद्र दिगंबर महागावे रा. सांगवी, ता. नायगाव, जि. नांदेड यांचा जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महागावे यांनी पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीमध्ये तुती कोष उत्पादन करून एका वर्षात ₹३,७९,६५६ इतके उत्पन्न मिळवत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना तालुकास्तरीय द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
रेशीम शेतीद्वारे शाश्वत उत्पन्न वाढविण्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या रामचंद्र महागावे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे पारंपारिक शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावे अशे आव्हान शेतकरी व जिल्हा अधिकारी यांनी केले आहे.



