Uncategorized

नायगाव : सामाजिक समता, बंधुता आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड आणि मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने ‘समता गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांतर्गत देण्यात येणारा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज परिवर्तन पुरस्कार २०२६’ यंदा सामाजिक कार्यकर्ते गायक श्याम गायकवाड नरसिकर यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या श्याम गायकवाड यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत संस्थेने त्यांच्या नावाची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून शोषित-वंचित समाजाच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. सामाजिक विषमता, अन्याय आणि रूढी-परंपरांविरोधात जनजागृती करत समाज परिवर्तनाचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.श्याम गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची संस्थेने घेतलेली दखल ही सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी संस्थेचे मारोती शिकारे, शंकरसिंह ठाकूर, तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, नागसेन जिगळेकर आणि सुरेश डोणगावकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्याम गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाज परिवर्तनाच्या कार्याला पुरस्काराची ऊर्जासमाजातील सकारात्मक बदलासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. ‘समता गौरव पुरस्कार २०२६’च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थांचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button