ताज्या बातम्यानांदेड

जप्त बेवारस दुचाकी व चारचाकी गाड्या मुळ मालकांनी कागदपत्र दाखवून घेवून जाव्या पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे आवाहन!

जयकुमार अडकिने

माहूर –  पोलीस ठाणे माहुर येथे ब-याचे कालावधी पासुन बेवारस वाहन जप्त आहे. त्या वाहनाचे उपलब्ध क्रमांक, चेसीस क्रमांक, इंजन क्रमांक यावरुन संबधीत वाहन मालकाने कागदपत्र (आर सी) आनून जप्त बेवारस दुचाकी व चारचाकी गाड्या मुळ मालकांनी घेउन जाव्यात असे आवाहन पोनी गणेश कराड यांनी केले आहे

माहूर पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहन हिरो होंडा फॅशन प्लस,सीडी डिलक्स,डबल एस,सीडी डॉन,प्रो,बजाज सिटी१००,प्लॉटिना,पल्सर१५०,यामाह,एक कार असे विस वाहने जप्त आहेत,तरी सदर वाहनाची निर्गती करणेपुर्वी पोलीस ठाणे माहुर येथे येवुन वाहनाची खात्री करावी व मुळ कागदपत्रासह पोलीस ठाणे या ठिकाणी दोन/तीन दिवासाचे आत संपर्क करावा. सदरचे वाहन मुदतीतीत ताब्यात न घेतल्यास वाहनाचे रितसर लिलाव करुन लिलावाअंती येणारी रक्कम ही शासन कोडवर जमा करण्यात येईल . अधिक माहीती करीता मारोती चव्हाण लेखनिक पोलीस हवालदार मो,९३०७२७१३४८ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!