ताज्या बातम्यानांदेड

नायगावचे पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांचे अपघाती निधन.

भरधाव इनोव्हा कारची धडक; पत्रकार जागीच ठार ; तालुक्यात हळहळ.

नायगाव :

पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक प्रश्नांना नेहमीच वाचा फोडणारे नायगाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद चन्नावार (वय ५०) यांचे रविवारी (दि. २४ ऑगस्ट) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने तालुक्यासह पत्रकारितेमध्ये शोककळा पसरली आहे.                    रविवारी दुपारी साधारणपणे चारच्या सुमारास रामप्रसाद चन्नावार हे नायगावहून नांदेडकडे कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी ते थांबत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.                    धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी तब्बल १९ फुटांवर फेकली गेली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने नायगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.                                                   कारचा राजकीय संबंध                                                   या अपघातात सामील झालेली इनोव्हा कार नांदेड येथील एका आमदारांच्या पतसंस्थेची असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालया मध्ये धाव घेतली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.                                                                           रात्री अकरा वाजताअंत्यसंस्कार                           अपघाताची वार्ता समजताच नायगाव व परिसरातील पत्रकार, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी रुग्णालयात धावले. संध्याकाळी त्यांचे पार्थिव शोकाकुल वातावरणात घरी आणण्यात आले. रात्री उशिरा नायगावच्या सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.    पत्रकारितेतील योगदान.                                       रामप्रसाद चन्नावार यांनी दीर्घकाळ स्थानिक पातळीवर पत्रकारिता करताना शेतकरी प्रश्न, ग्रामीण समस्या, सामाजिक अन्याय आणि शासकीय यंत्रणेतील त्रुटी ठळकपणे मांडल्या. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्न प्रशासनाच्या दखलीत गेले. त्यामुळे ते नेहमीच लोकांसाठी आवाज उठवणारे निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!