
इकळी मोरे नायगाव तालुका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पिराजी वाघमारे, वर्गशिक्षक वसंत निवळीकर, महेश चौधरी, लालू जोडवाड, बैलके बी. डी, सौ. लक्ष्मीबाई शुनेवार, सौ. जयश्री टरके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविन पाटील मोरे, सदस्य वडजे, तसेच सरपंच साहेबराव पाटील मोरे, पोलीस पाटील माधव हळदेकर, इस्माईल पठाण, मौला पठाण, तिरुपती मोटरगे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
पात्र विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शिष्यवृत्ती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला.

