नांदेड

श्री रेणुकादेवी संस्थानच्या धर्मशाळेची इमारत बनली भूत बंगला ! अशासकीय विश्वस्तांच्या मालकीच्या खासगी लॉजिंग व समांतर ट्रस्टमुळेच धर्मशाळेकडे दुर्लक्ष !.

माहूर – जयकुमार अडकीने
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान मंदिर न्यासाच्या मालकीची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध असलेली इमारत जमीनदोस्त करून त्याठिकाणी नवीन इमारत बांधकाम केल्यास भाविकांना निवासासाठी नाममात्र दरात धर्मशाळा उपलब्ध होऊ शकते व त्या ठीकांनी सुसज्ज सांस्कृतिक सभागृह सुद्धा निर्माण होऊ शकते. मात्र न्यासाच्या महत्वाच्या पदावर शासकीय अधिकारी पदसिद्ध पदाधिकारी असतांना सुद्धा शहरात खाजगी लॉजिंग व्यवसाय असणाऱ्या खाजगी विश्वस्तांवर निर्भर राहून त्यांच्यावर मेहरनजर ठेऊन कामकाज चालू असल्यामुळे जाणीवपूर्वक या धर्मशाळेकडे विश्वस्त समिती चे दुर्लक्ष होत असल्याने ही संस्थानची धर्मशाळा इमारत भूत बंगला बनली आहे. काही अशासकीय विश्वस्तांचे शहरात खासगी लॉजिंग चालू आहेत व संस्थानवर न्यासाच्या अनेक कलमांची पायमल्ली होत असल्याचे सांगण्यात येते. रेणुकादेवीच्या नावाने काही समांतर ट्रस्ट माहूर शहरात असून त्या ट्रस्टच्या धर्मशाळेच्या हिताला बाधा येऊ नये म्हणूनच या धर्मशाळेच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे.
काही खासगी अशासकीय विश्वस्तांच्या इशाऱ्यावरच संस्थानचा कारभार चालत असल्याने मा. अध्यक्षांनी सदर संस्थान हितविरोधी अशासकीय विश्वस्त नेहमीच संस्थानचे नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या खासगी व्यवसायिक पुजाऱ्यांना सर्व बाबतीत अघोषित मोकळीक दिल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. पदसिद्ध पदावरील शासकीय पदाधिकारीच न्यासहिताबाबत असंवेदनशील असल्याचे सांगण्यात येते मात्र संस्थांनच्या मालकीची धर्मशाळेची भव्य इमारत शहराच्या भर वस्तीत असतांना सुद्धा त्या ठीकांनी सुसज्ज भाविक निवास का उभारण्यात येत नाही ? असा यक्षप्रश्न भाविकांसह स्थानिकांना पडला आहे.
या ठिकाणी अनेक विषारी जातींचे साप, इंगळया व विंचवाचे आश्रयस्थान बनल्याने स्थानिक नागरिकांना या बाबीचा प्रचंड त्रास तर होतोच तर दुसरीकडे रेणुकादेवी दत्तप्रभू अनुसया मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांकरिता संस्थानातर्फे जागा उपलब्ध असतांना सुद्धा निवासाची व्यवस्था नसल्याने महागड्या दारात खाजगी हॉटेल, धर्मशाळा व विश्रामगृहाचा शोध घ्यावा लागून खिशावर जास्तीच आर्थिक ताण पडतो यात्राकाळात भाविकांची मोठी धावपळ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!