क्रीडानांदेडनायगाव

राज्यस्तरीय असोसिएशन कबड्डी स्पर्धा नायगाव येथे घेण्यासाठी प्रयत्नशील ; शिवराज पाटील होटाळकर

नायगाव: दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा संचलित मिलेनियम पब्लिक स्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या अंतर्गत शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. शिवराज पाटील होटाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार ठोंबरे उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. होटाळकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या जीवनात मोबाईलपेक्षा खेळ महत्वाचा आहे. क्रीडासंकुलांची उभारणी व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळेच दर्जेदार खेळाडू तयार होतील. मी स्वतः खेळाडू होतो, त्यामुळे खेळाडू घडवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. राज्यस्तरीय असोसिएशन कबड्डी स्पर्धा नायगावमध्ये घेण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आणि महाराष्ट्र कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहे.”

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले साहित्य देण्याची तयारी दर्शवली. “कोणताही विद्यार्थी खेळापासून वंचित राहता कामा नये, यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी प्रयत्न करावेत,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमास विविध तालुक्यांतून आलेले क्रीडा अधिकारी व संयोजक उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. विजय काकडे, संजय बेतेवार, बालाजी शिरशीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, विपुल दापके, आकाश भोरे, नवनाथ पोटफोडे (मुखेड), नंदकिशोर जाधव (बिलोली), जीवनराव पवार (नायगाव), सूर्यवंशी सर (देगलूर), ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बन सर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मठपती सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नायगाव तालुक्याचे क्रीडा संयोजक श्री. जीवनराव पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!