ताज्या बातम्यानांदेडनायगाव

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर रामतीर्थ पोलिसांच्या जाळ्यात ; २५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

नायगाव :बाळासाहेब पांडे

नद्यांचे खोरे उघडे पडत असून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या अवैध रेती तस्करीवर रामतीर्थ पोलीसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. केरूर शिवारात शनिवारी (दि. २३ ऑगस्ट) संध्याकाळी ५ वाजता हायवा टिप्पर पकडून तब्बल २५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई कशी उघडकीस आली?                          सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना केरूर शिवारात वेगाने जाणारा हायवा संशयित वाटला. तत्काळ वाहनाला अडवून तपासणी केली असता हायवा क्रमांक एम.एच. २६ सी.एच. ९६१२ मध्ये मोठ्या प्रमाणावर रेती साठवलेली आढळली.                                                  जप्त केलेला ऐवज;  टिप्परमध्ये सुमारे सात ब्रास रेती आढळली. वाहनासह रेतीचा एकूण मुद्देमाल तब्बल २५ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.        गुन्हा दाखल   या प्रकरणी पोलीस शिपाई अशोक यरपलवाड यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालका याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.                            पोलीस अधीक्षकांकडून कौतुक.                                    अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे व त्यांच्या पथकाचे शाबासकी देऊन विशेष कौतुक केले आहे.      पार्श्वभूमी : अवैध रेती वाहतुकीचे वाढते संकत.                  नायगाव परिसरासह जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासन महसूलास मोठा तोटा सहन करावा लागत असून नदीपात्रांचे नुकसान होऊन पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे.                               पुढील कारवाई व शासनाची भूमिका.                                 या प्रकरणी महसूल विभागाशी समन्वय साधून जप्त रेतीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरलेला हायवा टिप्पर दीर्घकाळासाठी जप्त ठेवण्याचीही शक्यता आहे. शासन स्तरावर अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी सतत गस्त, सीसीटीव्ही नजर, तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.                या टिपर मध्ये शासकीय कर्मचाऱ्याची भागीदारी.         असल्याची माहिती असून या पूर्वी उस्मान नगर पोलिसांनी तीन महिन्या पूर्वी ही हायवा पकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने काही दिवसात ही हायवा रस्त्यावर आणण्यासाठी नायगावच्या तहसीलदार गायकवाड मॅडम, व त्यांचे लाडके चालक पुरी प्रयत्न करणार हे ठरलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!