ताज्या बातम्यानांदेडनायगाव

अंजना भालेराव नरसी जिल्हा परिषद गटातून इच्छु.

नायगाव :

– येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजनाताई दिगंबर भालेराव यान नरसी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छुक असल्याची चर्चा सोशल मीडियातून त्यांच्या समर्थकांमार्फत सुरू आहे.

दिगंबर भालेराव हे चव्हाण कुटुंबीयाशी एकनिष्ठ सच्चे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते गेल्या दोन ते तीन दशकांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव शरद भालेराव हे काँग्रेस पक्षाकडून नायगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आहेत. खा. रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांचे अतिशय विश्वासू निकटवर्तीय कार्यकर्त्याची यादीतील व मर्जीतील भालेराव कुटुंबीय ओळखले जाते. नरसी जिल्हापरिषद गट हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असल्या ने येथून अंजनाताईं भालेराव यांना काँग्रेस कडून उमेदवारीची मागणी देखील केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास त्याच्या अंजना भालेराव यांच्या माध्यमातून काँग्रेसला एक य शांत, संयमी भालेराव कुटुंबियांच्या पाहुणेरावळ्यांसह मोठा जनाधार काँग्रेसच्या येथील विजयासाठी मिळू शकतो. याबाबत सोशल मिडियात त्यांच्या उमेदवारी वरून नरसी गटात चर्चा ही सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!