ताज्या बातम्यानांदेड

माहूर मध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.

भाजपाकडून जातीवादाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न  ; युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांचा आरोप!..

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे *जिल्हाध्यक्ष* बालाजी गाडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात दि. 4 जाने. रोजी दु. 1 वा.आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व पक्ष संघटन अधिक मजबूत करण्या संदर्भात आढावा घेण्यात आल्याचे गाडे पाटील म्हणाले.

पत्रकार परिषदेत गाडे पाटील यांनी नांदेड महानगर पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून मतदारांत ध्रुवीकरण करण्यासाठीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंदू-मुस्लिम असा भेदाभेद सुरु केलाय असा घणाघाती प्रहार करून त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला. एकत्र आलेल्या सर्व भ्रष्टाचऱ्यांचा व लुटारुंचा पक्ष म्हणजे भाजप असा गाडे पाटलांनी भाजपवर हल्ला चढवीला.प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला, त्यात सत्ताधाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचा आरोप त्यांनी केला.पक्षात कर्तव्याच्या आधारावर सर्वांना समान न्याय दिला जाईल अशी खात्री त्यांनी दिली. समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस मैदान गाजवेल असा आत्मविश्वास गाडे पाटलांनी व्यक्त केला.यावेळी तालुकाध्यक्ष आनंद पाटील तूपदाळे पाटील संग्राम देशमुख, आकाश गिरी,मोहन राठोड,किसन राठोड जब्बारभाई,गफार भाई सचिन बेहेरे, जयकुमार अडकीने,

सिद्धार्थ तामगाडगे, राजु सौंदलकर,संजय गायकवाड, शरीफ भाई, जगदीश तुपदाळे,

सलमान काजी,मन्नान भाई,सादिक भाई,

आदींची उपस्थिती होती. याच बैठकीत माहूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी सचिन बेहेरे यांची तर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्राध्यापक सलमान काजी यांची नियुक्ती करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!