
नायगाव :- बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध कृष्णूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या नव्या वर्ग खोलीचे बांधकाम सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने शाळेच्या नवीन कामाची वाट लागली आहे. नायगाव तालुक्यातील कुष्णुर जिल्हा परिषद शाळेत नवीन चार खोली बांधकामा साठी समग्र योजनेतून 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाअसतानाही योग्य काम न करता गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे जमिनी पासूनच गुणवत्तेचा अभाव दिसून येतो आहे. सदर बांधकाम सज्जा लेव्हल घेतले गेले नाही, प्लेअर सुधा योग्य प्रकारे बसवले गेले नाहीत, आणि उभी प्लेर वाकवून साईज कमी करून ढासळत्या गुणवत्तेचे काम केले जात असल्याची तक्रार येथील जागरूक पालकांनी केली आहे.
गुत्तेदार तमन्ना यांची मनमानी सदर कामात गुत्तेदार यांनी बांधकामाच्या ठिकाणी लेंटल न टाकताच चौकट तयार करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे कामकाजात तांत्रिक त्रुटी स्पष्टपणे दिसत आहेत. गुत्तेदार पुरुषोत्तम तमन्ना यांना संपर्क केला असता सवयी प्रमाणे फोन घेणे टाळले .
किवळकर अभियंता यांची कामात चूक झाल्याची कबुली या कामावर देखरेख करणारे समर्ग् अंतर्गत अभियंता किवळेकर यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले की हे बांधकाम चुकीचे झाले असून परस्पर चालू केल्याने आम्ही ते दुरुस्त करून लेंटल टाकून योग्य पद्धतीने चौकट तयार करू, असे आश्वासन दिले. प्रशासन गप्प; जनतेत संताप
शाळेचे हे बांधकाम तालुक्यातील आमदार आणि खासदार यांच्या यांच्या निवासी तालुक्यातील आहे, शिवाय नायगाव नांदेड रस्त्यावर असलेली ही शाळा आहे.तरीदेखील त्याकडे त्यां दोघांचंचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक जाहीर पणे म्हणतात. स्थानिकांनी या बांधकामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण करावे, अशी मागणी केली आहे. या शाळेचे बांधकाम दीर्घकाळ टिकावे अशी अपेक्षा असताना, सध्या सुरू असलेले काम केवळ कागदावरच दर्जेदार असून प्रत्यक्षात मात्र खचणारे आहे. तमन्ना कन्स्ट्रक्शन पुऋषोत्तम तमन्ना यांनी फोन उचलणे टाळले. तमन्ना कन्स्ट्रक्शन पुऋषोत्तम तमन्ना यांना फोन केला असता नेहमीच्या सवयी प्रमाणे तमन्ना यांनी फोन उचलणे टाळले या मुळे गुत्तेदार यांची प्रतिक्रिया अनेक वेळा फोन लावून मिळाली नाही या बोगस कामाची चौकशी सी इ ओ मॅडम करतील अशी अपेक्षा येथील जनतेला आहे. प्रमुख मुद्दे: 65 लाखांचा निधी असूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम लेंन्टर शिवाय चौकट टाकण्याचा प्रयत्न अभियंता किवळेकर यांचा कबुलीजबाब: “काम चुकीचे आहे, लवकरच दुरुस्त करू” पालकांची मागणी: CEO यांनी प्रत्यक्ष चौकशी करावी आमदार-खासदारांचे दुर्लक्ष, स्थानिकांत संताप.


