गुन्हेगारीताज्या बातम्यानांदेडनायगाव

कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रकरण आजही निकाली नाही!?. पोलीस प्रशासन सुस्त नागरिक त्रस्त !?…

कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रकरण आजही निकाल नाही ..पोलीस प्रशासन सुस्त नागरिक त्रस्त..
कुंटूर वार्ताहर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 45 गावे येतात .2022 पासून कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी , मोटरसायकल चोरी अशा अनेक प्रकरण जसेच्या तसेच असून त्या प्रकरणाचा निकालही लावण्यात कुंटूर पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांना यश आले नाही. त्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाविषयी नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त केले जात आहे .26 फेब्रुवारी 2024 रोजी शेळगाव व कोकलेगाव येथे 19 लाख 60 हजार रुपयांचे चणाडाळ असलेल्या ट्रकला रात्रीचे नऊ वाजता पलटी मारल्याने लुटण्यात आला व त्यातील 19 लाख 60.000 ची चनादाळ हे चोरांनी लंपास केली तरी ह्या प्रकरणाचा निकाल अद्यापही लागला नाही . त्याचबरोबर वंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सर्व रेकॉर्ड अज्ञात चोराणी जाळून टाकले त्या 14 एप्रिल 2023 रोजी ही घटना घडली त्याही घटनेचा आजपर्यंत निकाल लावण्यात कुंटूर पोलिसांना कोणते यश आले नाही. कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी व शेतातून शेतकऱ्यांचा माल लंपास करणे शेळ्या चोरणे मोटरसायकल चोरी करणे व घरातील दाग दागिने सहित धाडसी चोरीचे प्रकरण घडले असून पोलिसांना ह्या सदर घटनेची चौकशी करून तपास मात्र लावता आले नाही .त्यामुळे पोलीस सक्रिय च्या जागी निष्क्रिय झाल्याची नागरिकतन बोलल्या जाते असून सामान्य नागरिकांना न्याय देण्याची काम पोलिसांमार्फत होत नाही व धनदांगडे गुत्तेदार असो व अवैध वाहतूकदार असो व अवैध धंदे करणाऱ्याला मात्र पोलिसांचे पाडबळ असल्याचे स्पष्ट नागरिकांतून बोलल्या जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारला तेव्हापासून चार मोठ्या चोऱ्या व दोन जबरी घटना घडल्या सदर घटनेचा निकाल लावण्यासाठी पोलीस प्रशासन सुस्त झाले . असून या प्रकरणाचा निकाल आज पर्यंत का लागला नाही असा सवाल नागरिक करत आहेत. कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 45 गावातील नागरिकांचे अडीअडचणी व त्यांच्या सामाजिक व न्यायाचे प्रश्न तसेच अवैध दारू अवैध व्यवसाय मटका जुगार भांडण तंटे सोडवण्याची जबाबदारी मात्र पोलीस प्रशासनावर असून पोलीस मात्र याकडे लक्षही देत नसल्याचेही नागरिकांत बोलल्या जात आहे . वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कुंटूर येथील पोलीस स्टेशनच्या कारभाराविषयी माहिती घेऊन योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!