नांदेडप्रशासकीय

मदनापूर पोस्टमनचा कामाचा सावळा गोंधळ.. एकाच्या नावावरचे ओळखपत्र दुसऱ्याच्या हातात.

माहुर:- जयकुमार अडकिने

माहूर- प्राचीन काळापासून विश्वासार्थ ठरणारी भारतीय डाक सेवा यावर मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचा विश्वास बसलेला आहे हा विश्वास आज सुद्धा कायमस्वरूपी असल्याने शासनाच्या महत्त्वाच्या कागदपत्राची देवाणघेवाण पोस्टामार्फतच होताना दिसून येते पण मदनापुर येथील पोस्टमन प्रजापती भद्रे हिने कर्तव्यामध्ये बेजबाबदारपणे एका व्यक्तीचे निवडणूक आयोगामार्फत आलेले पार्सल दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन आपल्या कामाचा सावळा गोंधळ या ठिकाणी चवट्यावर आला आहे…..

सविस्तर बातमी अशी की मदनापूर येथील रहिवाशी अजय संतोष कोगुरुवार यांचे राज्य निवडणूक आयोगामार्फत पाठवण्यात आलेल्या मतदान ओळखपत्राचे पार्सल आर्टिकल नंबर BY495573254IN या मतदार ओळखपत्राचा मेसेज दिनांक ०२/०६/२०२५ रोजी पाठविण्यात आले आहे असा संदेश प्राप्त झाला त्यानंतर ०४/०६/२०२५ रोजी ओळखपत्र व्यक्तीस प्राप्त झाले आहे असाही संदेश आला . पण प्रत्यक्षात सदर व्यक्तीला ओळखपत्र हातात मिळाले नसल्याकारणाने त्यांना विचारणा केली असता सर्व उडवा उडी चे उत्तर देत होते म्हणून सदर व्यक्तीने सब पोस्ट मास्टर वाई बाजार या ठिकाणी लेखी स्वरूपाची तक्रार दिनांक २७/०६/२०२५ रोजी केलेली आहे सदर माझे कार्ड पोस्टमन यांनी कोणाला दिले. माझे कार्ड मला प्राप्त झाले नाहीत सदर कार्ड मला लवकरात लवकर मिळावे नाहीतर योग्य ती कर्तव्यात कसूर असणाऱ्या पोस्टमन वर कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदन देण्यात आले यावर वरिष्ठ यावर वरिष्ठ कोणती कारवाई करेल याकडे तक्रारदार चे लक्ष लागलेले आहे

प्रतिक्रिया  पोस्टमन यांना आम्ही लेखी स्वरूपात खुलासा मागितला आहे. ते आल्यानंतर योग्य ती कारवाई करू…

मुधळकर सब पोस्ट मास्टर वाई बाजार

माझे कागदपत्र निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे असल्याने माझ्या घरच्यांच्या हातामध्ये देण्याऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या हातात स्पीड पोस्ट कार्ड कोणत्या आधारे दिले याचा अर्थ तुम्ही बेजबाबदारपणे कर्तव्य करताना दिसून येत आहे निवडणूक आयोगामार्फत आलेले कागद मला मिळावे हीच अपेक्षा

अजय कोगुरुवार तक्रारदार मदनापुर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!