
नांदेड जिल्ह्यात अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलचे पाणी पातळी कमी झाल्याने पाणी कमी येत आहे पाण्याची वाट तासंतास नागरिकांना पाणी भरण्यासाठी बोरवेलवर वाट बघावी लागते. दिवसभर आम्हाला पाणी भरण्याचं काम करावं लागतं अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली तर गावात पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत असंही महिला म्हणाल्यात. गावात अनेक नवरदेव आहेत मात्र गावात पाणी असल्याने या गावात पाण्याची टंचाई असल्याने आमच्या मुलांना कोणी मुलगी देत नाही खासदर अशोकराव चव्हाण यांनी लक्ष देऊन गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे .

