बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्याचे एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसी चौरस्ता बाजारपेठेत महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून येथील विविध दुकानांमध्ये खरेदीच्या निमित्ताने जाऊन चैनिच्या वस्तू चोरी करण्याचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून उघडकीस आले आहेत.चोरीचे प्रलंबित तपास,नरसी पोलिस करत नसल्यामुळे गुन्हेगारीवर आळा घालणं अवघड झाले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी येथील राहुल सोमांवार यांचे दत्तकृपा जनरल स्टोअर्स त्याचबरोबर प्रदीप जोशी यांचे मातोश्री बेन्टेक्स ब्युटी शॉपी या दुकानांमध्ये खरेदीच्या निमित्ताने चार-पाच महिला दिवसाढवळ्या घुसल्या आणि तेथील दुकानदाराची नजर चुकवून किमती वस्तू चोरून प्रसार झाले असल्याची माहिती येथील दुकानदारांनी दिली आहे .विशेष म्हणजे प्रदीप जोशी यांच्या दुकानांचा आंतर म्हणजे पोलिस चौकी पासून केवळ रस्ताच आडवा आहे.
त्याचबरोबर येथील बस स्थानकामध्ये देखील अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत मात्र या महिला चोरट्यांना पकडण्यासाठी येथील पोलीस यंत्रणा नेहमीच अपयशी ठरते या चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करते याकडे येथील जनतेचे लक्ष लागले आहे .
चौरस्ता हा चार राज्याला जोडणारा असून येथे चोरी विरोधी पथक असणे गरजेचे आहे या साठी काही उपाय योजना करता आले तर आजुन चांगले होइल.

