
नायगाव बाळासाहेब पांडे
अपघातात निधन झालेल्या छावा तालुका अध्यक्ष कदम यांच्या मुलाला शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिवराज पाटील होटाळकर यांनी लावला समाज मनावर लावला संवेदनशीलतेचा दिवा :एका निरागस बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत “दत्तक संस्कार” जपणाऱ्या शिवराज पाटील होटाळकर यांचा मनोमिळावूपणा! सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
छावा संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष कै. प्रताप पाटील कदम सोमठाणकर यांचे अपघातानंतर तब्बल चार महिने हैदराबाद येथील रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांनंतर, दिनांक २९/०५/२५ रोजी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती प्रणिता प्रताप कदम, दोन चिमुकले पुत्र हनुमंत व पियुष, आई कौतिकबाई हनुमंतराव कदम, भाऊ पांडुरंग कदम, तसेच पुतणे श्रीकांत व कृष्णा यांच मोठ कुटुंबीय आहे.
कदम यांच्या वर या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी असताना त्यांचा हा जीवनप्रवास अपुरा झाला.ही बाब गावकऱ्यांच्या मनात काळजाचा ठाव घेणारा ठरला.अशा दु:खद वेळी, दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा चे अध्यक्ष, माजी शिक्षण व अर्थ सभापती जि.प. नांदेड व सध्या नायगाव मार्केट कमिटीचे उपसभापती श्री. शिवराज पाटील होटाळकर साहेब यांनी आपल्या कर्तव्यतत्परतेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवत. दिनांक २९ रोजी कै. प्रताप पाटील कदम यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सोमठाणा येथे शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी सांत्वन पर भेट दिली.
ग्रामस्थांच्या मनातील हळव्या भावना ओळखून, त्यांच्या केवळ सहा वर्षांच्या पियुष प्रतापराव कदम या निरागस बालकाच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ‘दत्तक पालक’ म्हणून होटाळकर यांनी स्विकारली.हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर एका उद्याच्या शिक्षित, सुसंस्कारित नागरिकाचा पाया घालण्याचा सकारात्मक विचार या निर्णयामागे आहे. या कृत्याने “माणुसकी अजूनही जिवंत आहे”, याची सर्वत्र प्रचिती दिली.
या प्रसंगी श्रीपत पाटील शिंदे, जीवनराव पा. कदम, नागोराव पा. कदम, शहाजी कदम, नवनाथ पा. कदम, राजू पा. कदम, व्यंकट शेषराव पा. कदम, आकाश पा. कदम तसेच परिसरातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पूर्वी शाळेत मुले घेऊन येणाऱ्या ताकबीड येथील माऊली कुरे यांचे निधन झाल्या नंतर त्यांच्या मुलीचे ही शिक्षण करून देऊन योग्य ती मदत त्यांनी बाळासाहेब पांडे यांच्या साक्षीने केली होती.शिवराज पाटील होटाळकर साहेबांनी दाखवलेले हे उदात्त पाऊल हे केवळ एका मुलाचे जीवन घडवणारे नव्हे, तर अनेकांच्या हृदयात विश्वास निर्माण करणारे ठरले आहे.शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते :”संसार तर प्रत्येकजण चालवतो, पण दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होऊन त्याला उभं करणारेच खरे ‘माणूस’ असतात.” 🌸

