ताज्या बातम्यानांदेडनायगाव

रमाबाई आंबेडकर महिलांना मिळाल्या उद्योग व्यवसायासाठी ट्रॅक्टर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान ग्रामीण भागात यशस्वी.

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील येथील रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रम व विविध विषय घेऊन सामाजिक प्रबोधन तसेच बचत गटाविषयी जनजागृती अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट गट म्हणून जिल्हास्तर व विभागीय स्तरावर पारितोषिक अनेक पारितोषिक मिळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान नांदेड अंतर्गत नायगाव तालुका येथील पंचायत समिती अंतर्गत कुंटूर येथील रमाबाई आंबेडकर महिला बचत गटांच्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी एक ट्रॅक्टर दहा लाख रुपयाचे ट्रॅक्टर खरेदी करून त्यांना उद्योग व्यवसायासाठी देण्यात आले .यावेळी नायगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे ,बाबू चंद्रकांत डोळे, ईरवंत सूर्यकर, यांच्या सहकार्याने कुंटूर येथील नारीशक्ती महिला प्रभाग संघात मध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या निधीतून नारीशक्ती महिला प्रभाग संघातून दहा लाख रुपये रक्कम एकता महिला ग्राम संघ कुंटूर यांना ट्रान्सफर करण्यात आले. व तेथून एकदा महिला ग्राम संघातून रमाबाई आंबेडकर ह्या उत्कृष्ट गटाला , नारीशक्ती महिला प्रभाग संघ कुंटूर यांची मासिक बैठक घेऊन असा ठराव अध्यक्ष कोमल मोहन गजभारे व सचिव यांच्या सहमतीने रमाबाई महिला बचत गटांना सदर निधी वर्ग करून ट्रॅक्टर घेण्यास सहकार्य केले. अध्यक्ष कोमल मोहन गजभारे यांच्या अध्यक्षतेखाली कुंटूर येथे नारीशक्ती महिला प्रभाग संघाची बैठक घेण्यात आली.सचिव सर्व बैठक घेऊन तालुका अभियान व्यवस्थापक यांच्यासमोर आदेशाने सदर दहा लाख रुपयांचे ट्रॅक्टर उद्योग व्यवसाय करून त्यांची भरभराटीसाठी एक चांगला मार्ग व दळणवळणाची सोय त्याचबरोबर महिला सशक्तीकरणाकडे पाऊल टाकल्यामुळे ग्रामीण भागातही महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाला मात्र एक झळाळी दिसून आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण राज्य जीवन्नोती अभियान तालुका नायगाव या अंतर्गत गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या अंतर्गत अनेक महिला बचत गटाची स्थापना झाली व त्या महिला बचत गटांनी करोडो रुपयांची कर्ज घेऊन उद्योग व्यवसायाकडे वळले आहेत . नायगाव तालुक्यातील अनेक महिला बचत गट उत्कृष्टरित्या उद्योग व्यवसाय करून आपली भरभराट करून दारिद्र्यातून समृद्धीकडे वाटचाल करत आहेत .महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हे एक महिला वर्गासाठी सशक्त आर्थिक बळ ठरला आहे. त्यामुळे या बळाची माहिती व त्यांचा आधार घेत महिलांनी आपापल्या उद्योग व्यवसायात भरभराटी करत असल्याने ग्रामीण भागात मात्र बचत गट हे उत्कृष्टरित्या कामे करताना दिसत आहेत. सदर महिला बचत गटाच्या दाही महिला उपस्थित राहून पंचायत समिती येथील कुंटूर येथील नारी शक्ती महिला प्रभाग संघने, एकता महिला ग्राम संघ कुंटूर , यांनी रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या महिलांना न्यू हॉलंड ह्या कंपनीचे दहा लाख रुपयाचे ट्रॅक्टर व त्याचे साहित्य पुरवले आहे. त्यामुळे सदर महिला हे उद्योग वयाकडे वळल्या असून एक उत्कृष्ट कार्य म्हणून तालुक्यात नावा रुपाला येत आहे. रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाच्या अध्यक्ष कोमल मोहन गजभारे ,सचिव ज्योती विलास हनुमंते ,बीके -कविता शेषराव गजभारे ,कल्लुबाई मारुती गजभारे ,आशाबाई बाबासाहेब हनुमंते, छाया उद्धव हनुमंते ,मोहनाबाई विठ्ठल हनवटे ,शोभाबाई उत्तम हनुमंते ,वंदनाबाई वामन हनुमंते, रेखाबाई मालू कांबळे,दाही महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे आभार मानले असून उद्योग व्यवसायाला आम्हाला आर्थिक मदत केल्यामुळे सदर व्यवसाय म्हणून आम्ही हे योग्यरीत्या पार पाडू व वेळेवर त्यांचे हप्ते भरून आम्ही आमची उन्नती साधू असे यावेळी गटाचे सर्व रमाबाई आंबेडकर महिला बचत गट कुंटूर महिलांनी मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!