
माहूर- महाराष्ट्र शासनाच्या हिंदीशक्तीच्या जीआर ची शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दिनांक 29 रोजी माहूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होळी करून निषेध करण्यात आला.शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदी सक्तीच्या विरोधात जीआरची होळी करण्यात आली आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आले यावेळी विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवासेना
जिल्हाप्रमुख यश खराटे शिवसेना तालुका प्रमुख जितू चोले, शहर प्रमुख बालाजी वाघमारे युवासेना जिल्हा समन्व्यक आकाश सातव, तालुका प्रमुख अक्षय वाघ, संदीप गोरडे,गजानन चव्हाण,मंगेश सुकळकर, अभिषेक जयस्वाल, दीपक कांबळे,अरविंद दवणे,वाशीम शेख, कनिष्क वानखेडे, आशीर्वाद आढावे,विनोद मार्गमवार यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

