
माहूर शहर व तालुक्यातील घरकुलधारकांना मोफत ५ ब्रास खासगी बांधकामधारकांना ६०० रु. ब्रास दराने वाळू उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या . पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले उर्वरित २० हजार रुपये आद्यप थकीत आहेत. एकूण चार डीपीआर मधील ११०३ लाभार्थ्यापैकी १०२७लाभार्थ्यांचे ५० हजार रुपये चे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे या मागण्याकरिता कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी भर पावसात शेकडो लाभार्थ्यासह दि. २२ रोजी तहसील कार्यालय माहूर समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ,सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिथ चंद्रा दोनथूला व माहूरचे तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेऊन घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास व खासगी बांधकाम धारकांना ६०० रु. ब्रास दराने वाळू डेपो मधून रेती उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही सुरु केली. तर नगर पंचायत चे मुख्याधिकारी विवेक कांदे, कार्यालय अधीक्षक मारेवाड यांनी येत्या दहा दिवसात निधीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध होताच घरकुल धारकांचे प्रलंबित हप्ते लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने व उपोषणार्थीच्या मागण्या मार्गी लागल्याने उपोषण तातपुरते स्थगित करण्यात आले. पत्रकार इलियास बावाणी व जयकुमार अडकीने यांनी प्रशासन व उपोषणार्थी यांच्यात यशस्वी शिष्टाई करून भर पावसात सुरु करण्यात आलेले उपोषण स्थगित केले. यावेळी शेकडो लाभार्थ्यांच्या वतीने आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ,सहाय्यक जिल्हाधिकारी जेनिथ चंद्रा दोनथूला व माहूरचे तहसीलदार मुंगाजी काकडे, न.प.चे मुख्याधिकारी विवेक कांदे, यांचे आभार मानले. यावेळी मंडळ अधिकारी सीताराम साळसुंदर, तलाठी चंद्रकांत बाबर,न.प.चे कार्यालय अधीक्षक मारेवाड, नगर अभियंता विशाल ढोरे, न.प. कर्मचारी विजय शिंदे, गणेश जाधव, आदीची उपस्थिती होती. उपोषणार्थी यांनी यावेळी नगर पंचायतचे कोणत्याही लोकप्रतिनिधीनी उपोषणाला साधी भेट सुद्धा न दिल्याबदल खंत व्यक्त करून जाहीर निषेध व्यक्त केला.

