Uncategorized

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन.

माहुर : जयकुमार अडकिने

केज/माहूर तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी 2021 मध्ये माहूर येथे तहसीलदार तसेच नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या अपघाती निधनाने माहूर शहरातही तीव्र हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!