
माहूर :- जयकुमार अडकीनेश्री. क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी आलेले मंगरूळ येथील सहा भावीक आपल्या कारणे रात्री साडेदहाला परत जात असताना जोराच्या पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने घातक वळणा वरून सरळ कारणे दरीत जंप घेत 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याने कार मध्ये बसलेले सहा भाविक बालम बाल बचावले असून झाडांना कार अडकल्याने जास्त खोलदरीत कार गेलीनाही त्यामुळे किरकोळ जखमा वरून बला टळली असून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाने त्यांना प्रथमोपचार करून घरी पाठवल्याची घटना दि 29 रोजी रात्री 10.30 वाजता घडली आहे. माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या घातक वळणावर ज्या ठिकाणाहून भगवान श्री परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता बनविण्यात आला आहे त्या वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या सुरक्षा रक्षक कठड्यावाजा प्लेटा काढण्यात आल्याने अनेक वाहने तेथे अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या असून काल रात्री मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा प्रचंड जोर होता त्यामुळे मंगरूळ येथील भाविक भाविकांची कार या वळणावरून तुफान पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार सरळ दरीत कोसळली कार मध्ये बसलेले सौरभ महेंद्र मरोडकर वय 27 वर्ष आकाश गजानन खालकोने वय 28 वर्ष सुयोग सुरेंद्र चव्हाण व 28 वर्ष रोशन शरदराव मरोडकर वय 33 वर्ष अक्षय प्रमोद हळदे व य 27 वर्ष भूषण संदीपराव पिंपळे वय 25 वर्ष सर्व राहणार मंगरूळ दस्तगीर हे कार मध्ये अडकल्याने तसेच कार झाडाला अडकुन खोल दरीत जाताजाता बालम बाल बचावली पावसामुळे बचावासाठी कोणीही नसल्याने त्यांनी कसेबसे रस्त्यावर येऊन खाजगी वाहनाद्वारे ग्रामीण रुग्णालय गाठले येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय वाठोरे यांनी प्रथमोपचार करून त्यांना त्यांचे गावी पाठविले
श्रीक्षेत्र माहूर शहरापासून ते रेणुका माता मंदिर आणि श्री दत्त शिखर संस्थान पर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी नादुरुस्त असून वळणावर सुरक्षा भिंत किंवा सुरक्षा कठडे अनेक ठिकाणी निघालेले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे

