ताज्या बातम्यानांदेड

माहूर तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.

माहूर तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर. श्रीक्षेत्र माहूरमाहूर तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दि 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी सरवरण यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या उपस्थितीत वसंतराव त्रिग्वेदा लाडे या 5 वर्षाच्या चिमुकलीच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे बिगर अनुसूचित क्षेत्रातील सन 2025-2023 साठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.सरपंच पदाचे आरक्षणशे.फ.वजरा,गुंडवळ, दत्तमांजरी ,नागरिकांचा प्रवर्ग महिला,मांडवा,शेकापुर, नागरिकांचा मागास प्रवर्ग,आसोली,लांजी, लखमापूर,कुपटी,लिंबायत बोरवाडी,बोरवाडी,हडसणी सर्वसाधारण महिला, पवनाळा, पापलवाडी, अनमाळ,तांदळा,रुई,मालवाडा, ईवळेश्वर सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.यावेळी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी तहसीलदार अभिजित जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button