आरोग्यताज्या बातम्यानांदेडनायगाव

सुदृढ बालक, उज्वल भविष्यासाठी शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे ५५१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

नायगाव

श्री शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. सुदृढ बालक, उज्वल भविष्यासाठी या उपक्रमात एकूण ५५१ विद्यार्थ्यांची – या मध्ये २६६ मुली व २८५ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये वजन, उंची, कर्णदोष, उच्चारदोष व अंगदोष आदी बाबींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील वैद्यकीय पथकाने हा उपक्रम पार पाडला.प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपक्रमात डॉ.अविनाश पांढरे कोठाळकर, डॉ. तृप्ती बिराजदार,यांनी विद्यार्थांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची माहिती दिली.औषध निर्माता तुराब पठाण,परिचारिका रेखा राजबंडवार,यांनी विद्यार्थी तपासणी साठी विशेष परिश्रम करत मदत केली.

 स्वच्छतेवर विशेष भर-

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वैयक्ति क स्वच्छता, स्वच्छ आहार, निटनेट केपणा, सर्दी-खोकल्याची काळजी घेण्याबाबत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये सर्दी, खोकला यासारख्या लक्षणे आढळून आली असून त्यांना आवश्य क औषधोपचारही करण्यात आले.

शाळेचा सहभाग व स्वागत

शाळेचे प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे यांनी वैद्यकीय पथकाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या आरोग्याबाबत विद्यार्थी यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बी एस. निलावार ,एम. आर. सालेगाये ,जे.डी.पाटील,बी.जी. होटकर,सौ. ए .बी.कदम,येडे.पी.जी.श्रीमती जे.बी.मंगरुळे,कर्मचाऱ्यांमध्ये तानाजी मारकवाड,फकीर साब शेख, के.के.कदम,गणेश शिंदे, रेजितवाड सर,मोखेडे सर,आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!