
माहूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती माहूर शहरातील अहिल्यादेवी चौक येथे आज दिनांक ३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी,नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे,डॉ.निरंजन केशवे,विलास गावंडे संतोष गंदे,निळकंठ मस्के , कैलास महाले,संतोष शिंगाडे ,तानाजी मानवे,विजय आमले,अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या फलक पूजन कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानीम्हणाले की,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारतीय इतिहासातील उत्कृष्ट महिला शासकांपैकी एक मानले जाते. ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं त्यांचे विचार तरुणात व विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे त्यांच्या कार्याचा आपण वसा पुढे घेऊन गेलो तर येणारी पिढीचे भविष्य नक्कीच उज्वल होईल.असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी कृष्णा माने बाबळे सर,अनिल वाघमारे रणधीर पाटील,रहमत भाई बाळासाहेब देशमुख,निलेश हुंबे पुरुषोत्तम लांडगे,गोविंद शिंदे,जोशी सर,स्वाती आडे पद्मा गिरे,कुमरे ताई,रामकृष्ण केंद्रे,विनायक मुसळे यांची अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती होती.प्रास्ताविक व आभार धनगर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू सौंदलकर यांनी केले.

