Uncategorizedताज्या बातम्यानांदेडनायगावशेती

कुंटूर परिसरात 80 टक्के पेरण्या पूर्ण पावसाने दिले उघड कुठे पीक उमगलं तर कुठे पेरणी सुरू पावसाचा नाही पत्ता.

कुंटूर :- अनिल कांबळे

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून पाऊस पडला नसल्यामुळे पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असून 80% पेरणी झाले. असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी पेरणी सोयाबीन कापूस उडीद मुग ,अशी लागवड केली मात्र पावसाने उघड दिल्याने काही जणांच्या शेतातील पीक ही उमगले व मोड आलेले लागले असून त्या मोडला योग्य पावसाचा साथ मिळाली तर ते पीक जोमाने येईल अन्यथा पीक कोमेजून जाऊन नष्ट होईल अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे . चार दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून महागाचे बी बियाणे खते व पेरणीचा खर्च पाहता दुबार पेरणी करणे योग्य नाही व परवडणार नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सतावत आहे. पावसाने जर साथ दिली तर पेरणी योग्य पाऊस पडला तर पिके तारतील अन्यथा सर्व पैकी कोमेजून जाऊन दुबार पेरणीचे संकट येईल अशी परिस्थिती एकूण परिसरात निर्माण झाली आहे. काही शेतकरी पेरणी करण्याचे राहून गेले त्यामुळे पाऊस येत नसल्यामुळे ते थांबले आहेत त्यामुळे काही शेतकरी पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत असून 20% शेतकरी मात्र पाऊस केव्हा पडणार पेरणी पूर्ण केव्हा होणार या आशेवर थांबले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्याची परिस्थिती तळ्यात मळ्यात अशी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!