
जयकुमार अडकिने
माहूर- जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र.२०२५/जीबी/डेस्क१/टे-५/ग्रापनि/सरपंच आरक्षण २०२५/सीआर ०२ दिनांक २३/०६/२०२५ मधील निर्देशानुसार दिनांक १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माहूर येथील पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहात २०२५ ते २०३० या पाच वर्षाकरिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील २१ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत नियंत्रण अधिकारी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथचंद्र दोन्थूला व प्राधिकृत अधिकारी माहूरचे तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व माजी.जि.प.पं.स. सदस्य, पत्रकार, सरपंच ग्रा.प. सदस्य, यांच्या उपस्थितीत पार पडली, बिगर अनुसूचित क्षेत्रातील २१ ग्रामपंचायत पैकी १ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, ६ ना.मा.प्र. १३ सर्वसाधारण साठी सोडण्यात आल्या त्यामध्ये अंतगर्त महिला पुरुष आरक्षणात मेट अनुसूचित जाती महिला, महादापूर अनुसूचित जमाती महिला, ६ ना.मा. प्र. आरक्षित ग्रा.प पैकी लिंबायत, गुंडवळ,शे.फ. वझरा ह्या ३ ग्रा.प. महिला साठी तर दत्तमांजरी, मांडवा, शेकापूर ना.मा.प्र.सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्या, सर्वसाधारण १३ ग्रा.प. पैकी आसोली, लांजी, लखमापूर,कुपटी,मालवाडा,आनमाळ पवनाळा ह्या ७ ग्रा.प. सर्वसाधारण महिला करिता आरक्षित झाल्या मालवाडा, आनमाळ, पवनाळा ह्या तीन ग्रा.प. ईश्वरचिट्ठी टाकून आरक्षित झाल्या.रुई,बोरवाडी,पापलवाडी,हडसनी,तांदळा, ईवळेश्वर ह्या सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी बैठकीचे नियोजन केले प्रकाश शडमाके व महसूल कर्मचारी यांनी सहकार्य केले.

