ताज्या बातम्यानांदेडनायगाव

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी बाळासाहेब पांडे यांची निवड.

नायगाव

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय ‘दर्पण बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ जेष्ठ पत्रकार डी मा. बाळासाहेब पांडे यांना जाहीर झाला असून त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे.

सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य व मुकनायक वाचनालय मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन येत्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मांजरम (ता. नायगाव जि. नांदेड) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.                                                              .      ग्रामीण भागातील प्रश्न, जनसामान्यांचे दुःख-दर्द, अन्याया विरोधातील आवाज व सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड पत्रकारिता केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत साप्तरंगी साहित्य मंडळाने हा सन्मान जाहीर केल्याचे पुरस्कार निवडपत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवडीमुळे नायगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक व वाचक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, बाळासाहेब पांडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे ग्रामीण पत्रकारितेचा सन्मान उंचावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, व्हॉईस ऑफ मिडिया शाखा नांदेड ,नायगाव,पदाधिकारी,सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, मुकनायक वाचनालय मांजरम चे पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी नागरिकांनी बाळासाहेब पांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दर्पण दिनी पांडे यांचा नायगाव व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार                                                  बाळासाहेब पांडे यांची पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल नायगाव व्हॉईस ऑफ मिडिया यांच्या वतीने दर्पण दिनी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक श्याम पानेगावकर सर यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला या वेळी सपोनी विशाल भोसले कुंटूर, से.नि.प्राचार्य रमेश कदम,व्याख्याता प्रा.राजेश्वरी कदम,जेष्ठ पत्रकार माधवमामा कोकुर्ले,भा. ग. मोरे, वाहबुद्दीन शेख,संपादक प्रकाश हणमंते,शिवाजी पनासे,साहित्य मंडळ जिल्हाध्यक्ष रणजीत गोनारकर,साहित्य संमेलन संयोजक मूकनायक चे आयोजक जीवन मांजरमकर व व्हॉईस ऑफ मिडिया चे शिलेदार यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!