नांदेडनायगाव

विजेचे पोल वाकले, तुटले, विजेचे तार लोमकळले गावातील सर्वच पोल निकृष्ट स्थितीमध्ये नागरिक भयभीत .

कुंटूर :- अणिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर 33 केव्ही अंतर्गत कुंटूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तब्बल पन्नास वर्षांपासून विजेचे पोल रोवण्यात आले. होते तेव्हापासून आजपर्यंत एकही पोल नवीन बसवण्यात आला नाही त्यामुळे सदर पोल उंची कमी झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाला लागून तारे तुटत आहे. त्यात जमिनीपासून सात फुटाच्या उंचीवर हातालाही लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व विजेचे पोल हे गावातील बदलून नवीन पोल उंचीचे पोल बसविण्यात यावे अशी गावकऱ्याची मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे .
मात्र गावातील ग्रामविकास अधिकारी गावात येत नसल्यामुळे सरपंच ही लक्ष देत नसल्यामुळे गावातील नागरिकांना या विजेच्या ताराचा व विजेचे निकृष्ट पोलाचा त्रास सहन करावा लागत आहे . ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी लक्ष देऊन कुंटूर मधील सर्व वार्डातील विजेचे पोल नवीन बसवण्यात येऊन त्यांची उंची वाढवून नवीन विजेचे तार व पोल बसविण्यात यावे.अशी मागणी नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकार्‍यांनी माहिती दिली असता त्यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांचे लेखी पत्र आम्हाला द्या तेव्हा आम्ही पोल ची व्यवस्था करून गावातील सर्व खोल बदलून देऊं असे सांगीतले. मात्र ग्राम विकास अधिकारी व सरपंच लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!