ताज्या बातम्यानांदेडनायगाव

पुनर्वसित गावातील नाली व रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी मंत्रालयात केली तक्रार…..

कुंटूर :- सिद्धार्थ गजभारे

तालुक्यातील मौजे हुस्सा, राहेर, सांगवी,कुंटूर अदी गावांना मदत व पुनर्वसन विभागाकडून नायगाव विधानसभा सदस्य यांच्याअथक प्रयत्नाने प्रति गावांना कोट्यावधीचा निधी मिळाला आहे. आणि यातील बऱ्याच गावांना जिल्हा नियोजन समितीकडून देखील कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी पुनर्वसित गावासाठी व गावांच्या पायाभूत सोयीसुविधा भक्कमपणे मजबूत करण्याकरिता आणि गाव विकसित व सुजलाम सुफलाम होण्याकरिता हा निधी देण्यात आला होता परंतु संबंधित इंजिनिअर संबंधित अभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने यामुळे गावातील संतप्त गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर काम शासनाने नेमून दिलेल्या अंदाज पत्रकानुसार करण्याऐवजी संबंधित गुत्तेदार यांनी मर्जीने कामाचा मोठ्या प्रमाणात सारवा सारव केली जात आहे. आणि गावाच्या विकासासाठी कोठ्यावधी
रुपयांचे निधीचे तीन तेरा केल्याचे अक्षरशा दिसून येत आहे. एकूणच कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व बोगस कामे करून बिले काढण्याच्या घाईत कामात मात्र अनियमितता असल्याचे दिसून येत आहे.
सदर कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल रस्त्यावर अल्प मुरूमचा वापर रस्त्यांची व नाल्याची लांबी,रुंदी,व उंची करण्यात आली नाही. किंवा रस्ते व नाली ची योग्य लाईन काढण्यात आली नाही. अर्थात संबंधित इंजिनिअर यांना हाताशी धरून गुत्तेदार यांनी मर्जीनेच काम करत आहे. गावातील कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने गावातील काही नागरिकांनी संबंधित इंजिनिअर व गुत्तेदारांना जाब विचारला असता त्यांच्याकडून दमदाटीची व उद्धट भाषा करण्यात आली आहे. आणि इंजिनिअर यांच्याकडून गावातील नागरिकांना बनवाबनवी करून चुकीची माहिती देत असल्याने संतप्त गावकरी यावेळी पत्रकार अशोक पांडुरंग वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई उर्फ सोनाली प्रकाश हंबर्डे, भगवान पाटील नरवाडे सामाजिक कार्यकर्ते, सिद्धार्थ मारुती गजभारे पॅंथर कार्यकर्ते नागेश गणपत वाघमारे, परमेश्वर नागोराव वाघमारे, अदी नागरिकांनी मंत्रालयाचा मार्ग धरून थेट ग्रामविकास मंत्रालय विधान भवन मुंबई व विभागीय आयुक्त संभाजीनगर येथे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. निवेदनात निकृष्ट दर्जाचे काम करणारे संबंधित गुत्तेदार व इंजिनिअर यांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीअंती संबंधित गुत्तेदार यांचे परवानगी रद्द करण्यात यावे व संबंधित इंजिनियर यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. व सदर कामाची वेळेत चौकशी झाली नाही तर तारीख निश्चित करून संबंधित कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग अमरण उपोषण करण्याचा इशारा संतप्त गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

इंजिनिअर यांच्याकडून उडवा उडी…

पुनर्वशीद गावाचे रस्ते नाले बांधकामात थोडंफार कमी जास्त होत असेल व त्याला मी जास्त काय बोलणार नाही. तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तिथे करा पण ते काम आमच्या मर्जीनेच करू त्या तक्रारीने आम्हाला काही फरक पडणार नाही – संबंधित इंजिनिअर

गुत्तेदार यांच्याकडून दमदाठीची भाषा….

चालू असलेले काम आमच्या पद्धतीने आम्ही करून आम्हाला मुरमाचा जास्त परवाना मिळाला नाही त्यात पावसाळा चालू झाला त्याला आम्ही काय करणार चालू असलेले कामात आमच्या आड कोणी आले तर बरे होणार नाही कोणाला कुठे काय तक्रार करायची तिथे करा तशा तक्रारी आम्ही लई पाहिले त्या तक्रारी आमच्यासाठी महत्त्वाच्या नाही किंवा आम्ही त्यांना काही महत्व देत नाही.
— संबंधित गुत्तेदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!