नायगाव बाळासाहेब पांडे
नांदेड जिल्हयातील नायगाव तालुक्यातील रातोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सन 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत तब्बल ₹14,67,587/- इतक्या शासकीय निधीची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक एस. जी. वडजे व सरपंच सुमनबाई पिराजी देशमुख यांच्याविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुरनं. 124/2025 अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
येथील गैर प्रकारात फसवणुकीची पद्धत :आगळी वेगळी असून
या प्रकरणात 15व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीतून पाणीपुरवठा नळ जोडणी, आपले सरकार सेवा केंद्र, कच्चा रस्ता, नाली दुरुस्ती, सीसी नाली व सीसी रस्ता बांधकाम, शाळा व संगणक दुरुस्ती आदी विविध कामांसाठी निधी आला होता. मात्र, प्रत्यक्षात ही कामे न करता, खोटे कागदपत्र तयार करून, कामे पूर्ण झाल्याचे भासवण्यात आले. या बनावट कागदपत्रांवर दोघांनीही संयुक्त स्वाक्षऱ्या व डिजीटल स्वाक्षऱ्या करून शासनाची दिशाभूल केली आणि कट रचून शासकीय निधीचा अपहार केला.
या प्रकरणाची तक्रार शेख जाकीर शेख सगीर (वय 34), नगरसेवक – अर्धापूर नगरपालिका व संस्थापक अध्यक्ष – जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तोटावार हे करत असून, अधिक तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 485, 467, 468, 471, 474, 406, 409, 34, 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जे गंभीर स्वरूपाचे असून फौजदारी कारवाईस पात्र आहेत.
या प्रकरणाने प्रत्येक ग्रामपंचायतीतील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, गावकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

