
जयकुमार अडकीने
माहूर:-स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यातून समृध्दी असा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिला आहे.जिथे स्वच्छता असते तिथे तेथे आरोग्याची धन संपदा असते.म्हणून स्वच्छतेला महत्व असून ते प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
आज दिनांक १६ सोमवार रोजी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर ह्या माहूर येथे दर्शनाच्या व आनंद दत्त धाम आश्रम भेटी च्या निमित्ताने नियोजित दौऱ्यावर आल्या होत्या. या वेळी त्यांनी प्रथम माहूर गडावरील भगवान दत्त प्रभू,माता रेणुकेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्त धाम आश्रमास भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी आश्रमाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी भक्तांना संबधित करताना ना.मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुघलांनी उध्वस्त केलेल्या मंदिराची उभारणी करण्याचे काम ३०० वर्षापूर्वी अहिल्यादेवी यांनी केले. त्यांच्याच विचाराचा वारसा पुढे नीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्राचा मंदिर अयोध्येत उभा केला,काशी कॉरिडॉर उभारले,उज्जैन मंदिराचा विकास केला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ही तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून भरभरून निधीची घोषणा केली आहे.त्यात श्रीक्षेत्र माहुर चा देखील समावेश आहे.प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्जेदार व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरून आपणास ऊर्जा मिळते त्या साठी आमचे देवाभाऊ चे सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.साईनाथ महाराज वसमतकर यांनी माहूर या संत भूमीचे महत्व विषद करताना राज्यसरकार चा स्वच्छता दूत म्हणून शेवटच्या श्वास असे पर्यंत देश सेवा करण्याचा मानस व्यक्त केला.या वेळी खा.नागेश पाटील आष्टीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, प्राचार्य राजेंद्र केशवे, संध्याताई राठोड, संजय राठोड, नगरसेवक गोपू महामुने रमेश बद्दीवार,, भाजपचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के अनिल वाघमारे, विनायक मुसळे आदिस प्रमुख उपस्थितःसह हजारो शिष्यमंडळी उपस्थिती होती.संचलन एस. एस पाटील यांनी तर आभार भाऊ पाटील यांनी मानले.

