
नायगाव : – महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नायगाव तालुक्यातील गडगा येथील शेतकरी त्रस्त झाले असून.ट्रान्फाॅर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळें एक महिन्यापासून डिपी बंद अवस्थेत असून.महावितरणाच्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्याचे काही देणे घेणे नसल्याचे वर्तन करित मनमानी कारभार चालू आहे.
कृषी पंपाचा वारंवार वीजपुरवठा खंडित होणे.अनेक शेतकऱ्यांच्या शेत शिवारात विधुत वाहिणीचे तारे अनेक दिवसापासून जमीनीवर पाडुन आहेत.यांच्यासह अनेक समस्याना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.मात्र महावितरणाचे कर्मचाऱ्यारी निढेर झाल्यासारखे वागत आहे.
मांजरम रोड शेजारी असलेल्या गडगा येथील डिपी तब्बल एक महिन्यापासून बंद अवस्थेत असून.विंनती करुनही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची समस्या सुटत नाही.संबधित वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबीकडे तातडीने दखल घेऊन विधुत पुरवठा सुरळीत सुरू सहकार्य करावे.अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते.
मागील विस दिवसापासून पाऊस गायब झाला आहे.कवळे पिके सुकवून माना जमीनीवर टाकत आहेत.विहिरीला पाणी असून लाईट नाही. त्यामुळे संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

