ताज्या बातम्यानांदेड

काळ्या वाळूचा “रात्रीस खेळ चाले” चा पर्दाफाश.

एस पी चें आदेश धडकताच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवाला कुंटुर पोलिसांनी घेतले ताब्यात...

नायगांव  : सय्यद जाफर

नायगांव तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक केली जाते याचे ज्वलंत उदाहरण काल रात्रीला देगांवमध्ये काळया वाळूने खचाखच भरलेला हायवा फसुन बसल्याने “रात्रीस खेळ चाले” चा पर्दाफाश झाला. अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षकांनी कुंटुर पोलीसांना कारवाई चे आदेश दिले. साहेबांचे आदेश पाळत ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्या हायवावर रात्रभर पाळत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ठाण्यात नेवून लावला. त्यामुळे ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

नायगांव तालुक्यात आणि बाजुच्या तालुक्यात काळ्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे ज्वलंत उदाहरण कालच्या घटनेने समोर आले आहे. देगांव येथे दि १० मार्च रोजी रात्री १० : ३० वाजताच्या सुमारास काळ्या वाळूने खचाखच भरलेला MH 26 BE 3070 या क्रमांकाचा हायवा आला. आणि तो खाली करण्यापुर्वीच चिखलात फसुन बसला. रात्रीची वेळ असल्याने कोण बघणार या तोऱ्यत असणाऱ्या हायवा चालकाला व मालकाला महाग पडले. या विषयाची माहिती नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनेश कुमार यांना कळाली. त्यांनी लगेच कुंटूर पोलीस ठाण्याचे फौजदार विशाल भोसले यांना त्या हायवावर कारवाई करण्याचे आदेश सोडले. साहेबांचे आदेश आल्यानंतरही सुमारे एक ते दोन तास घटनास्थळी येण्यास उशीर लावला. त्यावेळेसच सदरील हायवा जाग्यावर वाळू टाकून पळण्याचा प्रयत्न करत होता. परंतु साहेबांनी दुसरा फोन केला अन् कान पिळल्यानंतर लगेच दहा मिनिटात ठाण्याचे कर्मचारी पल्लेवाड व कंधारे जाय मोक्यावर दाखल झाले. आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याचे मनसुबे उधळले. तेथून चालक-मालक दोघेही पसार झाले. ही घटना उघडकीस आल्याने खरोखरच काळ्या वाळूचा “रात्रीस खेळ चाले” याचा पर्दाफाश झाला.

MH 26 BE 3070 ह्या क्रमांकाची हायवा फसल्यामुळे रात्रभर कुंटुर पोलिसांकडून रात्रभर पहारा देण्यात आला. त्यात पल्लेवाड, कंधारे या दोघांनी पुर्ण रात्र जागत पहारा दिला. घटनास्थळी महसूल विभागाचे पथक उशीरा का होईना साधारण १२:३० ते १ वाजता च्या सुमारास दाखल झाले. चार तासांच्या नंतर महसूल विभागाला जाग आली. महसुलच्या या पथकात मंडळ अधिकारी आर के पवार, तलाठी हानंमते, शुभम पाटील, शिवकुमार मंगनाळे हे होते. अर्धी भरलेली व अर्धी जमीन वर फसलेली हायवा आढळून आली. ही पाहणी करून निघून गेले. दि ११ मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास जेसीबी बोलावून घेऊन कुंटूर पोलीसांनी सदरील हायवा पोलीस ठाण्यात नेऊन लावला आहे.

तहसीलचा आवहाल आल्यानंतर कारवाई करू — भोसले

या विषयाची माहिती घेण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी खुनाच्या प्रकरणात सध्या व्यस्त असुन एक हायवा पकडला आहे. त्या हायवाच्या मालकाचे म्हणणे आहे की, माझ्याकडे वाळूच्या पावत्या आहेत, सदरील पावत्या खऱ्या आहेत, की खोट्या हे तपासण्यासाठी तहसील कार्यालयाकडे आम्ही पाठवणार आहोत. त्यांचा अहवाल आला की, कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू करू अशी सांगीतले.

प्रकरणावर पडदा टाकून दाबण्याचा प्रयत्न…

अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच असताना कारवाईचा शुन्य च्या गणतीत आलेख राहूनही स्थानिक पोलीस ठाण्याचा कारभार मन म्हणेल ते चालू आहे. एस पी साहेबांच्या आदेशाने झालेल्या हायवावरील कारवाईवर पडदा टाकण्यासाठी मोठा जुगाड लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून दोन दिवस स्टॉक लिलावच्या पावत्या हस्तगत करून या प्रकरणावर वाळूमाफ्याला वाचविण्याचा प्रयत्न मोठ्या युद्ध पातळीवर चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पावत्या इन्व्हाईस आहेत का ? त्याच्यावर तारीख व वेळ कोणती ? ती वाळू घेऊन हायवा कुठे वाहतूक करीत होती ? जेथुन वाळू उचलली तिथले सी सी टीव्ही फुटेज आहेत का ? त्याचे लोकेशन कुठून कुठे आहे. हे पण तपासण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हा प्रकार म्हणजे एका वाळू माफियाला अभय देण्याचा प्रकार असून किमान एस पी साहेबांच्या आदेशाला तरी हरताळ फासण्यात येवू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!