ताज्या बातम्यानांदेडनायगावशैक्षणिक

सीईटी परीक्षेत नायगावची कन्या अंजली आरगुलवार : 98% गुणांसह प्राविण्य!.

नायगाव / प्रतिनिधी

नायगाव शहरातील कु. अंजली मनोज आरगुलवार हिने MAH-MHT CET (PCM गट) या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेत 98.00% गुण मिळवत आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने संपूर्ण नायगाव तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे.

अंजली ही तिच्या अभ्यासू वृत्तीबरोबरच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्काराने समृद्ध आहे. आई-वडील, आजी-आजोबा यांचे मार्गदर्शन, आणि महाराष्ट्रातील संत महात्म्यांचे आशिर्वाद हाच तिच्या यशामागचा खरा मंत्र असल्याचे ती नम्रपणे सांगते.    सातत्य, चिकाटी, मन लावून अभ्यास आणि कौटुंबिक पाठिंबा या आधारावरच अंजलीने हे यश संपादन केले आहे.          अंजलीच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, आर्य वैश्य समाज, तसेच कोनाळे कोचिंग क्लासेस मिञ परिवार यांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.  ही यशोगाथा आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. अंजलीने राज्यपातळीवरील परीक्षेत मिळवलेले हे यश तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला बळ देणारे ठरेल, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!