नांदेडनायगावशेती

कुंटूर परिसरात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आठ दिवस झाले पावसाचा थेंब पडला नाही पिके लागली कोमेजायला दुबार पेरणीचे शेतकऱ्यावर आले संकट.

कुंटूर अनिल कांबळे

नायगाव तालुक्यात कुंटूर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसाचा थेंब पडला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले व पीकही चांगले निघाले त्यामुळे पिकांना पाउस नसल्याने कोमेजुन व मरून जात आहेत . त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. हजारो रुपये खर्च करून बी बियाणे व शेतकरी,पेरणी करून शेतकरी हातबल झाला असून स्वतः जवळ सर्व पैसे खर्च करून शेतीमध्ये पीक पेरणी केली . त्या पिकांना पाऊस अभावी सुकून जात असताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे .पहिल्या पावसामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केल्याने सर्वच शेतकरी एकमेकाचे पाहून पेरणी केले .उडीद मूग सोयाबीन कापूस असे सर्व लागवड केल्याने शेतकरी पावसामुळे चांगले पीक येईल अशी अशा व्यक्त केले होते. मात्र पाऊस आठ दिवसापासून पडत नसल्याने शेतकरी मात्र हातभल झाला असून काही ठिकाणी पुन्हा पेरणी करण्याची संकट आले . पाऊस केव्हा पडणार आज आणि उद्या पडेल पुन्हा शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत . दोन दिवसात पाऊस जर पडला नसेल तर सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट चित्र कुंटूर परिसरामध्ये दिसून येत आहे . सदर 70% च्या वर पेरणी झालेली असून 30% पेरणी बाकी असली तरीही सर्व शेतकऱ्यांनी 70/ शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याचे संकट कुंटूर परिसरातील शेतकऱ्यावर आल्याचे भयानक चित्र समोर आले आहे . पावसाच्या प्रतीक्षेत आजही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. शेताकडे जाऊ वाटत नाही व घरी बसू वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडकला असून पीक कोमेजून जात असताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या कुंटूर परिसरामध्ये दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!