ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

कुंटूर येथील मौलाली दर्ग्याच्या परिसराची दुरावस्था शौचालय ना पाण्याची सोय दर्गासमोर रस्त्यावरच घाण पाणी साचतय . ग्रामपंचायत चे दुर्लक्ष.

कुंटूर :- अनिल कांबळे

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील मौलाली दर्गा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र कर्नाटक व हैदराबाद येथून या देवाच्या सवारीसाठी शहरा मागवला जातो व यांची पाच दिवस यात्रा मोहरम मध्ये भरली जाते मात्र ह्या देवस्थान कुंटूर येथे असूनही ना पर्यटन स्थळांमध्ये त्याची नोंदणी झाली व ग्रामपंचायत अंतर्गत कोणत्या सुविधाही पुरवण्यात आल्या नाहीत.नायगाव तालुक्यातील कुंटूर येतील मौलाली दर्ग्याच्या समोर नालीचे घाण पाणी साचत आहे. भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी मोठे अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून मौलाली दर्ग्याचे स्थापना सुपिसंत यांनी 400 वर्षा पूर्वी स्थापना करण्यात आल्याची माहिती गावकरी सांगतात.

या चारशे वर्षाचे पुराणी देवस्थान असूनही या दर्ग्याची दुरावस्था ग्रामपंचायत व सरपंच यांना दिसत नाही का असा प्रश्न नागरिक करत आहेत. मौलाली दर्गा येथील दर्ग्यासाठी हजारो नागरिक व भाविक भक्त दर शुक्रवारी रविवारी आपले नवस पिण्यासाठी येत असतात त्या नागरिकांना पिण्याची पाण्याची सोय व शौचालय तसेच बसण्यासाठी निवाऱ्याची सोय करण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी गेल्या अनेक वर्षापासून होत असताना सुद्धा ग्राम विकास अधिकारी व सरपंच हे लक्ष देत नाहीत. आमदार व खासदार यानी सदर पुराणी देवस्थान चारशे वर्षाचे देवस्थान असलेल्या मौलाली दर्ग्याची पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून पर्यटनाच्या यादीमध्ये नोंदणी करण्यात यावे अशी मागणी ही गावकऱ्यांनी आमदार राजेश पवार यांच्याकडे केली.होते मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही .सध्या पावसाळा सुरू झाला असून मोहरम सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच कुंटूर येथे पाच दिवस यात्रा महोत्सव सुरू होतो. त्यामुळे अनेक भाविक भक्त या दर्ग्यावर आपले नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र येथे अनेक सुविधांची वाणवा असल्याने भाविक भक्तांना मध्ये नाराजी पसरले आहे. गावकऱ्यांनी लक्ष देण्यात यावी व ग्रामपंचायतने सुविधा पुरविण्यात यावात अशी मागणी नागरिकांनी व भाविक भक्तांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!