ताज्या बातम्यानांदेडनायगाव

तांड्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास” या विषयावर डॉ. प्रा.शंकर राठोड यांना पीएचडी पदवी.

नायगाव :

ज्ञान, जिद्द आणि संशोधन यांचा संगम साधत नायगाव तालुक्यातील पोस्टबेसिक काजू कॉलेज, मरवाळी तांडा येथील प्राध्यापक तसेच मुखेड तालुक्यातील मांजरी गावचे सुपुत्र प्रा. डॉ. शंकर नामदेव राठोड यांनी आपला संशोधन प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत पी एच डी. पदवी संपादन केली आहे.त्यांच्या प्रबंधाचा विषय होता — “स्वतंत्र ग्रामपंचायत नसलेल्या तांड्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास: विशेष संदर्भ नांदेड जिल्हा”.

हा अभ्यास पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालय, देवणी येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दगडू नरसिंग दामावले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी संशोधकांचे मार्गदर्शक डॉ. दगडू दामावले, मौखिक परीक्षेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद लोणारकर, तसेच बाह्य परीक्षक डॉ. नवनाथ शिंदे हे उपस्थित होते. तसेच डॉ. संजय मुंडकर व डॉ. संतराम सर यांचीही उपस्थिती लाभली.

डॉ. राठोड हे केवळ संशोधक नव्हे तर शब्दांना अर्थ देणारे प्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि संवेदनशील समाजभान असलेले शिक्षक म्हणूनही ओळखले जातात.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बालक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रतन लक्ष्मण राठोड, सचिव बळीराम लक्ष्मण राठोड, माजी प्राचार्य व संचालक के. आर. राठोड, प्राचार्य व्ही. जी. देशमुख, कार्यवाहक व सरपंच डॉ. मधुकर गोपीनाथ राठोड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!