ताज्या बातम्यानांदेड

पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून वार्तांकन करूनस कारात्मक पत्रकारिता करावी!.

माहूर/किनवट – जयकुमार अडकिने

सकारात्मक पत्रकारितेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी न्याय्य भूमिका बजवावी, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष पांडगळे यांनी केले.

किनवट तालुका पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी च्या वर्षापूर्ती सोहळ्यात जिल्हा कार्यकारणी च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व मराठी पत्रकार परिषद शाखा किनवटच्या अधिकृत सदस्यांना ओळखपत्राचे वाटपाचा कार्यक्रम दि.२९ रोजी गोकुंदा येथील विसावा गार्डन येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष पांडगळे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर सरचिटणीस अनुराग पवळे, डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, राज्य कार्यकारणी सदस्य सरफराज दोसानी,

संघटनेचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष सुनील श्रीमनवार, जिल्हा संघटक प्रदीप वाकोडीकर, सचिव राज ठाकूर, कार्यकारणी सदस्य जयकुमार अडकिने, ज्येष्ठ पत्रकार फुलाजी गरड पाटील, गंगाराम गड्डमवार, मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष उमाकांत कर्‍हाळे, शहराध्यक्ष स्वागत आयनेनीवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पांडगळे म्हणाले की, नांदेड पासून किनवट चा शेवटचा भाग २०० किमी पर्यंत लांब असल्याने नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी किनवट जिल्हा निर्मिती ची मागील अनेक दिवसाची मागणी आहे, किनवट तालुका पत्रकार संघाने या साठी रेटा लावलेला आहे.जिल्हा निर्मिती च्या मागणी साठी किनवट तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिला. या वेळी बोलतांना मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार म्हणाले आमच्या राजकीय जडघडनीत पञकाराचे मोठे योगदान असून आम्ही कांही चुकलोतर ते निदर्शनास आनुन दिल्याने पुढचे पाउल सावध टाकण्यासाठी आम्हाला सहकार्य होते. यावेळी अनुराग पावळे, मुजीब भाई शेख, सरफराज दोसानी, प्रदीप वाकोडीकर, सुनील श्रीमनवार, इश्वर जाधव, ॲड सूर्यवंशी यांची समयोचित भाषणे झाली.प्रास्ताविक संघटनेचे सचिव बालाजी शिरसाट यांनी तर आभार तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर यांनी मानले,उत्कृष्ट संचलन बापूसाहेब तुपेकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरचा सत्कार करून लेखणी भेट दिली. यावेळी पञकारसंघाचे कार्याध्यक्ष, किरण ठाकरे, के मूर्ती, पुनवटकर, कचरु जोशी, मारोती शेळके, संपादक गौतम कांबळे, प्रकाश कार्लेवाड, भोजराज देशमुख, गोवींद चव्हाण, शिवाजी काळे, विजय जोशी, गौतम येरेकार, दिलीप राठोड, वैशपाल कांबळे, विनोद डवले, सुधाकर कदम, नितीन राठोड, आनंद सोनटक्के, अॅड शाम जाधव, माधव सुर्यवंशी यांचे सह संघटनेचे पदाधीकारी, सदस्य यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!