ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

गोदावरी नदीच्या पुलाचा कटडा गेला चोरीस वाहनधारकांना करावी लागते कसरत प्रवाशांचा जीव धोक्यात ..सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष!.

कुंटूर : अनिल कांबळे

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे बळेगाव येथील गोदावरी नदीवरील फुलाचे कठडे हे गायब झाले आहेत. का चोरीला गेले आहेत याची चौकशी मात्र अद्याप झाली नाही त्यामुळे सदर पुलावरून वाहतूक करण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची माहिती वाहनधारकांनी दिली आहे. गोदावरी नदीवरील फुलांचे उंचीचा पूल असून त्यावरून वाहतूक करणे म्हणजे जीव धोक्यात टाकत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूंचे पाईप लोखंडी पाइप हे चोरीस गेले का गायब झाले याचे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदार व नागरिकांना मोठे कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . त्या फुलाला कठडे बांधण्यात आले तर नागरिकांना सुरक्षा होईल मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी याकडे अद्यापही पाहिले नाही .त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव येथील जेई उपअभियंता बासरकर यांना निवेदन देऊन माहितीही दिली मात्र त्या माहितीचा काही उपयोग झाला नाही .अद्याप गेल्या पाच वर्षापासून पाईप व संरक्षण भिंती,कठडे पुलावरून गायब झाले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभकर्ण झोप लागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गोदावरी नदीवरील फुलांचे कठडे बसवण्यात यावी अशी मागणी वाहन धारक व प्रवाशांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!