ताज्या बातम्यानांदेडराजकीय

पुढची लढाई जिंकायची असेल तर आज पासून कामाला लागा; माजी मंत्री सूर्यकांता पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप)माहूर मध्ये कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न!.

माहूर:- जयकुमार अडकिने

माहूर:- आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ही कार्यकर्त्यांची निवडून आहे.या निवडणुकीत पहिले आपली माणसे निवडून आणायची आणि मग आपण निवडणूक लढवाई ची आहे.त्या मुळे पुढची लढाई जिंकायची असेल तर आज पासून कामाला लागा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी केल्या.

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडण्याच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २४ मंगळवार रोजी माहूर येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सूर्यकांता पाटील तर माजी गृहराज्य मंत्री माधवराव किन्हाळकर,जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर,महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावनगावकर, जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, सरचिनिटणीस डी.बी जांभूळकर,ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकते,नांदेड तालुका महिला अध्यक्षा संगीता सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर,ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष विश्वंभर भोसीकर, यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.दिवंगत नेते आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरवात करण्यात आलेल्या संवाद बैठकीला किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे युवा नेते कपिल नाईक,नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जीप चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,यांनी कार्यकर्त्यांच्या माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रति असलेल्या भावना व मागील दहा वर्षे सत्तेविना असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची भूमिका विषद करतांना नाईक साहेबांच्या कार्याचा आलेख मांडून आठवणींना उजाळा दिला.तर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी सरकार च्या नीतीचा खरपूस समाचार घेताना विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या नसल्याचा आरोप करून ७६ लाख मतांच्या गैरप्रकारातून राज्यातील प्रत्येक मतदार संघात २६ हजार मतदानाचा कसा घोळ झाला या बद्दल माहिती देताना लोकशाही धोक्यात आल्याचे ते म्हणाले.सत्ता मिळविण्यासाठी विरोधकांनी ई.डी , सीडी ची भीती दाखवून पक्ष फोडले,पक्षांतर बंदी कायदा तुडवला,फसव्या योजना आणल्या व मतांची चोरी केल्याची टीका माधवराव पाटील किन्हाळकर यांनी केली.अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सूर्यकांत पाटील म्हणाल्या की, जिभेवर साखर डोक्यावर बर्फ असणारा अतिशय सामान्य सर्वात मिळून राहणारा वयाने लहान पण मनाने मोठा असणारा आपल्या सर्वांचा लाडका प्रदीप आपल्यात नाही याचं अतिशय दुःख आहे.मात्र कार्यकर्त्यांच्या सह लोकांच्या मनात आज ही प्रदीप नाईक आहेत.लोक त्याला शोधतात त्यांची पोकळी भरून निघणार नाही.पण वेळ थांबत नाही,नवीन नेतृत्व निर्माण करताना ज्याला आमदार व्हायचं त्याला प्रदीप नाईक व्हावं लागेल.लोक पैशाचे नाही तर प्रेमाचे कामाचे भुकेले आहेत.इथून पुढील साडे तीन वर्ष जनतेत राहून जनतेची कामे करत मन जिंकावे लागेल,त्या वर तुढील राजकीय वाटचाल अवलंबून असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या पुढील विधानसभेची तयारी असल्याने या परीक्षेत पास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्या पुढे ठेवून आता पासून सगळ्यांनी कामाला लागा अशा सूचना सूर्यकांता पाटील यांनी केल्या.या वेळी माजी सभापती मारोती रेकुलवार,अर्चित नाईक,अमित नाईक,ॲड राहुल नाईक,धनलाल पवार,बालाजी पवार,प्रकाश गायकवाड,शहराध्यक्ष अमित येवतीकर ,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.प्रास्ताविक मनोज कीर्तनेव संचलन अर्जुन जाधव यांनी तर आभार लक्ष्मण घुले यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!