
माहूर:- जयकुमार अडकिने
माहूर तालुक्यातील नागरिक विविध समस्याने ग्रस्त असल्याची दखल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी घेतली असून तालुक्यातील प्रमुख समस्या बाबत तपशीलवार निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर, मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर यांना सादर करून तातडीने मागण्याची पूर्तता न झाल्यास तालुक्यातील समस्याग्रस्त हजारो नागरिकांसमवेत बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. त्यांच्या मागण्यामध्ये माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार खासगी कर्जे घेऊन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्याप पर्यत मिळाले नाही. पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले उर्वरित २० हजार रुपये आद्यप थकीत आहेंत. एकूण चार डीपीआर मधील ११०३ लाभार्थ्यापैकी १०२७ लाभार्थ्यांचे ५० हजार रुपये चे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळें सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे. माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःच्या जागा उपलब्ध नाहीत अशा लाभार्थ्यांना शासनामार्फत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडा तर्फे घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. तरी विनंती की, माहूर शहरातील जागे अभावी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना म्हाडा तर्फे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार माहूर शहरातील आवास योजनांच्या ६०० लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणे आवश्यक असतांना माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाने केवळ ४० लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ ३ ब्रास रेती ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली. ५४० लाभार्थी आद्याप मोफत ५ ब्रास रेती पासून वंचित आहेत. करिता उर्वरित ५४० लाभार्थ्यांना तातडीने मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. करिता विनंती करण्यात येते की माहूर शहरातील उर्वरित ५४० घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत मध्ये उपलब्ध करून द्यावी तसेच माहूर चे तत्कालीन तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांची बदली झाल्यानंतर दि. ०२ जून २०२५ पासून माहूर तहसील कार्यालयातील तहसीलदार यांची आयडी बंद असल्याने व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरिता रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय व रहिवासी प्रमाणपत्र, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, बेबाकी प्रमाणपत्रे व तहसील कार्यालयाच्या विविध प्रमाणपत्र नागरिकांना उपलब्ध होत नाहीत.तालुक्यातील हजारो नागरिकांचे कामे तहसील कार्यालयाच्या प्रमाणपत्राअभावी खोळंबलेली आहेत. शैक्षणिक सत्र सुरु झाल्याने विद्यार्थी व नागरिकांना प्रमाणपत्रे मिळणे अत्यंत आवश्यक आहे. करिता विनंती करण्यात येते की माहूर तहसीलदार यांची आयडी तात्काळ कार्यान्वित करून द्यावी ह्या मागण्याचा समावेश आहे. शेकडो घरकुल लाभार्थी व समस्याग्रस्त नागरिकांच्या उपस्थितीत तहसीलदार माहूर व मुख्याधिकारी न.प. माहूर यांना निवेदन सादर करण्यात आले

