ताज्या बातम्यानांदेड

औजारे तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, तर अनुदानाचा सर्वे अल्पवयीन खाजगी व्यक्तीमार्फत !.

 

माहूर  : जयकुमार अडकिने

:- राज्य कृषी यांत्रिक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री ट्रॅक्टर चालित औजारे, ठिबक सिंचन प्रणाली, पंप, स्प्रिंकलर आदी मिळण्यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवली त्यात अनेक शेतकऱ्यांनी ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या निकषांनुसार पात्रता मिळवली आणि स्वतःच्या खर्चावर साहित्या खरेदी केली.

खरेदी केलेल्या साही त्यांचे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असणारी तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्रे देण्याच्या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वर्तुळात अडकवले जात असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांकडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शासनाच्या निर्णयानुसार, लाभार्थी शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर कृषी विभागाकडून स्थळ तपासणी करून अहवाल सादर होणे आवश्यक आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्वे केला जात आहे. मात्र तालुका कृषी कार्यालयातील तपासणी उप कृषी तालुका अधिकारी विनोद कदम यांच्याशी शेतकऱ्यांनी भ्रमधोनी संपर्क साधला असता त्यावर दोन कृषी सहाय्यकाच्या संवादामधून खाजगी व्यक्तीला पैसे द्यावे लागते असे स्पष्ट झाले खाजगी व्यक्ती पाठवलेल्या व लाभार्थ्यांच्या संवादामधून हा मोठा खुलासा झाला सावरखेड मध्ये शेत शिवार असलेला लाभार्थी यांच्या संवादातून स्पष्ट झाले त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक प्रशासनातले जबाबदार व्यक्ती करताना संवादातून व्यक्त होतो

अशी लोकरवाडी येथील शेतकऱ्यांची संतापजनक प्रतिक्रिया असुन अतिवृष्टी, उत्पादन घट, आणि वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अनुदानासाठीही पैसे द्यावे लागत असेल तर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या वाढणारच आहे असे यांच्या संवादावरून सिद्ध होते यावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी वेळेत लक्ष घातल्यास याला आळा बसेल. का? या यात हात मिळवणे जर झाल्यास असाच बाजार वाढेल का.याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे

माहूर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांना संपर्क साधला असता भ्रम धोनिवर बेल जात असतानाही उचलल्या जात नव्हता .

जिल्हा अधीक्षक यांनाही संपर्क केलास असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही

मी आजपर्यंत अनेक अनुदानांचा लाभ घेतला आहे, त्यात कोणालाही एक रुपयाही दिला नव्हता पण तुषार सिंचनासाठी माझ्याकडून 1000 रुपयाची मागणी केल्याने आणि ते पण सर्वे खाजगी अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून माहूर तालुका उप कृषी अधिकारी विनोद कदम मागणी करत असेल तर शेतकऱ्याचे दिवाळी निघाल्याशिवाय राहणार नाही  अरविंद जाधव लोकरवाडी शेतकरी यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!