ताज्या बातम्यानांदेड

रोनित रोहिदास पवार बॉक्सिंग जिल्हा स्पर्धेत व विभागीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. 

कुंटूर :

इंदिरा इंटरनेशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी कडून रोनित रोहिदास पवार ह्यांनी १६ सप्टेंबर ला झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व १९ सप्टेंबरला नांदेड येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सुद्धा सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले.रोनित हा इन्स्पायर बॉक्सिंग अकॅडमी सिडको येथे नागराज चावरे (NIS coach ) यांच्या मार्गदशनाखाली प्रशिक्षण घेवून हे यश मिळवले आहे.सोबतच इन्स्पायर बॉक्सिंग अकॅडमी चे वैभव हटकर यांनी सुद्धा १९ वर्षाखालील वयोगटात जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहे .वैभव हटकर हे नांदेड येथील नामवंत वकील हटकर सरांचे सुपुत्र आहेत..                                              नागराज चावरे यांच्या इंस्पायर बॉक्सिंग अकॅडमी मधे प्रक्षिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करून नांदेड चे नाव उज्ज्वल केले आहे.सदरील यशामधे इंदिरा इंटरनेशनल पब्लिक स्कूल चे प्रिंसिपल विक्रम सर वाईस प्रिंसिपल रूपाली मॅडम, वर्ग शिक्षिका हेम मॅडम व स्पोर्ट शिक्षिका विजयश्री मॅडम यांचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!