ताज्या बातम्यानांदेड

प.पु.योगीराज खुशाल पुरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य ; श्री यदुराज संस्थान वनदेव येथे अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन.

माहूर- प.पु. समर्थ गुरुमूर्ती महायोगीराज खुशाल पुरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य श्री यदुराज संस्थान वनदेव माहूरगड येथे दि. २२ ते २९ जानेवारी पर्यत अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ रोजी सकाळी ६ वा. तीर्थस्थापना करण्यात येणार आहे. दि.२९ रोजी सकाळी ५ वा. काकडा आरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे. २९ रोजी सकाळी ८ वाजता श्रीच्या समाधीचा अभिषेक करण्यात येणार असून सकाळी ९ ते ३ पर्यत भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तभक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन सत्संग व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री यदुराज संस्थान वनदेव माहूरगड चे मठाधिश तथा मुख्य पुजारी तथा प.पु. श्री दत्तपुरीजी महाराज गोशाळा वनदेव माहूर व भोसा ता. महागाव चे पदसिद्ध अध्यक्ष प.पु. दत्त पुरी गुरु खुशाल पुरीजी महाराज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!