
माहूर
राष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था राजर्षी शाहू फाउंडेशन माहूर अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय माहूरच्या प्रांगणात राजर्षी फाउंडेशनचे अध्यक्ष भाग्यवंत भवरे सचिव सौ शितल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार इलियास बावाणी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून दि 20 रोजी सुरुवात करण्यात आली
माहूर तालुक्यासह राज्यभर गाजलेली संस्था राजर्षी शाहू फाउंडेशन अंतर्गत जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात वार्षिक स्नेहसंमेलन विशेष उल्लेखनीय असतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच शरीर प्रकृती सुदृढ राहावी या हेतूने दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजर्षी शाहू फाउंडेशन चे अध्यक्ष भाग्यवान भवरे सचिव सौ शितल भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्हाईस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खेळात प्राविण्य मिळवायचे असल्यास विद्यार्थी दशेतच सराव करावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले
यावेळी प्रमुख उपस्थितात प्रिन्सिपल संतोष कुमार सर उपप्राचार्य अहेफाज शेख, सुधीर गौरखेडे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच राजाराम गंदेवाड धनेश मुनेश्वर प्रतिभा पाटील आकाश राठोड कपिल चव्हाण नागेश महल्ले रोशनी राठोड किरण फड पल्लवी पाटील संध्या मॅडम प्राजक्ता मॅडम अजय राठोड वैष्णवी मॅडम पुनम मॅडम सोहेल सर यांचे सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्वरा गोरख जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन कु पार्थवी गावंडे यांनी केले

