ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

बरबडा वाडी परिसरातील गोदा पात्रातून वाळू उपशाची यत्रणा जप्त.

नायगाव बाळासाहेब पांडे

नायगाव तालुक्यातील बरबडा वाडी येथून गोदावरी नदी पात्रातून सेक्शन पंपाद्वारे उपसा केली जाणारी वाळू बऱ्याच दिवसा पासून महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू होती पण गुरुवारी पहाटे नायगाव तहसीलदार यांना भल्या पहाटे स्वप्नातून साक्षात्कार झाला आणि त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर भल्या पहाटे जाग्यावर जाऊन बोट पकडल्याची घटना घडली आहे.या नंतर

नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुदखेड व उमरी तहसीलदारांनी वाळू माफीयांना खुली सुट दिली असल्याने त्यांच्या भागात वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळू आता शिल्लक राहीली नाही.

कुठल्याच वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतात माफीयांनी अवैध उपसा करुन वाळू शिल्लक ठेवली नाही. त्या भागात वाळू नसल्याने वाळू माफीयांनी आपला मोर्चा नायगाव तालुक्याकडे वळवला आहे. मागच्या काही दिवसांपासून वाळू व मुरुम माफीयांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत केली होती. नायगाव तालुक्यातील नदीपात्राच्या परिसरात गस्त घालण्याच्या सुचना दिल्या होत्या तरीही बरबडा वाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरुच होता.

बरबडा वाडी परिसरात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सौ. धम्मप्रीया गायकवाड यांना मिळाली. त्यांनी कारवाई करण्यासाठी नांदेडवरुन एक बोट मागवली व नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, मंडळ अधिकारी काळे, आरू, कावळे तलाठी हसनपल्ले, शाम मुंडे, कारलेकर, चालक तुकाराम पुरी यांना सोबत घेवून गुरुवारी पहाटे बरबडा वाडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात उतरून कारवाई केली. यात तराफ्यावर सक्शनपंप ठेवून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता.

बरबडा वाडीत कारवाई? तर राहेर गोदापात्रातील वाळु चोरी करणाऱ्या वर कारवाई होईल का?.

 

f

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!