
नायगाव :
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आ.रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्या बद्दल भाजपाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पवार व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. पुनमताई राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव चौकात कार्यकर्त्यांनी मीठाई वाटून फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.
यावेळी भाजपा नायगाव उत्तरचे तालुकाध्यक्ष बालाजी मदेवाड, नायगाव दक्षिणचे श्रीहरी देशमुख, बाबासाहेब पाटील हंबर्डे, निलेशजी देशमुख, जयश्रीताई नरवाडे, सौ. पल्लवीताई वडजे, राजू आप्पा बेळगे, साईनाथ पाटील हेंडगे, कोठाळचे सरपंच भगवान पाटील ढगे, श्रीराम पाटील सुगावे, दत्ता बन होटाळकर, युवराज पाटील लालवनडीकर, बळीराम पाटील वडजे, माजी सरपंच मारोती पाटील कदम, विकास पाटील जाधव, मारुती घंटेवाड यांच्यासह अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

