ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगाव ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी एल आर वाजे यांचा निरोप समारंभ.

शंकर पाटील अडकिने

– नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे झाली. तर येथे नव्याने श्री. संजय मिरजकर यांनी गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. जाणाऱ्यांना निरोप तर येणाऱ्याचे स्वागत व ग्रामसेवकांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार सोहळा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने दि २ जुलै रोजी येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला व्यासपीठावर धर्माबाद गटविकास अधिकारी प्रफुल तोटावाड, उपविभागीय अंभियंता डी आय होनराव, विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, गणेश टोनगे, कृषी अधिकारी जोधळे, कक्ष अधिकारी सिनगिकर, महेश मुखेडकर, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शामसुंदर शिंदे, बदलीवर गेलेले विस्तार अधिकारी जी. बी.कानोडे, शाखा अभियंता गोणेवार, सहाय्यक अभियंता मयुर जिरवणकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष टी जी पाटील रातोळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना एल.आर. वाजे म्हणाले की, नायगांव तालुक्याचा नाव वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात होता. परंतु माझ्या कार्यकाळात काम करताना मला तसा कोणताही अनुभव आला नाही. काम करणाऱ्याला खूप काही सोपं असतं परंतु काही जण काम न करता फक्त वेळ वाया घालण्याचे काम करतात त्यांना हा तालुका जड जातो. मी प्रशासनाचे काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे मला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पत्रकार मित्रांचेही मला माझ्या कार्यकाळात खूप सहकार्य मिळाले असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्वांनीही बदलून गेलेले वाजे आणि आलेले मिरजकर या दोघांबद्दलही आपले मत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये गुणवंत विद्यार्थी बालाजी राजू मदेवाड, श्वेता विठलराव कानगुले, श्रद्धा अलका व्यँकटराव मुगटकर, समीक्षा विनायक कोंडावार यांना आई वडील यांच्यासहित सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल, हार घालून सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर, सचिव सुर्यकांत बोंडले, प्रल्हाद गोरे, दिलीप खैरनार, धनराज केते, नागेश यरसनवार, साईनाथ पा.चव्हाण, अशोक कदम, मिलिंद जोंधळे, संदीप मोरे, निलेश कुलकर्णी, राजू मद्देवाड, विठ्ठल कानगुले, नागोराव सूर्यवंशी, यादव सूर्यवंशी, गजानन इबिते, जगन्नाथ गोरलावाड, विश्वाभर यरपलवाड, नामदेव माने, रेडेवाड, बाजीराव रोडेवाड, विनोद झुंजूरे, हणमंत शिंदे, विठ्ठल वडजे, श्रीनिवास संगेवार, मनीष पेनेवार, शारदा भांजे, विद्या मोरे, अपर्णा बीजेवार, अलका मुगटकर, सुजाता शिंदे, सुप्रिया घाटे, गुट्टे मॅडम, गिरी मॅडम, हर्षा लाडके, गोरखवाड मॅडम, विजया शिंदे, मिमपुलवार मॅडम, विनायक कोंडावर, संदीप पुरजवर, डि एल वाघमारे, सदाशिव आगलावे, शरद लाडेकर के. एन. बोधले, कनिष्ठ अभियंता प्रमोद पाटील, सहाय्यक कनिष्ठ अभियंता व्ही सी गायकवाड, मारोती पा.कदम सोमठाणकर, शिवाजी पा.पळसगांवकर , ठाकुर , अर्जुन वजीरे , हानमंतराव मिरकुटे, दशरथ इरेवाड, माधव पवार, संजय पा.चोंडे, शिवराज वरवटे, भगवान ढगे, वहाण चालक गंगाधर पा.अडकिने यांच्या सह अनेक जणांची उपस्थिती होती. ग्रामसेवक संघटनेने घेतलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. टी. जी. पाटील रातोळीकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. नागेश यरसणवार व श्री. गजानन इबिते यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सूर्यकांत बोन्डले यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  गटविकास अधिकारी श्री. एल. आर. वाजे साहेब यांनी प्रामाणिकपणाने सर्वाना विश्वासात घेऊन काम केले. त्यांचा कार्यकाळ आम्हा सर्वासाठी अविस्मरणीय आहे.        श्री. टी. जी. रातोळीकर तालुकाध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!