ताज्या बातम्यानांदेडनायगाव

स्थानिकांचा नारा : आमचा उमेदवार आम्हालाच प्यारा!” ; बरबडा गटात बाहेरच्यांना नकार, धनश्री मोरे यांच्या उमेदवारीला भाजपात स्वीकार.

नायगाव :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या गटात उमेदवारीसाठी बाहेरून येणाऱ्या नेत्यांबाबत मतदारांमध्ये नाराजी असून, “गावच्या विकासासाठी स्थानिकालाच संधी हवी” असा ठाम सूर जनतेतून उमटताना दिसत आहे.

दरम्यान, भाजप नेते व खासदार अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी आपल्या पत्नी सौ. धनश्री मनोज पाटील मोरे यांना या गटातून पुढे करण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून गावोगावी भेटीगाठी, शिवारभेटी, महिलांशी संवाद, शेतकरी स्नेहसंमेलन या माध्यमातून पक्षाची पकड मजबूत करण्याचा धडाका लावला आहे.

त्यांच्या या प्रयत्नांना बरबडा, वजीरगाव, टाकळी, कहाळा परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक गावात “धनश्रीताई पुढे या —विकासाची दिशा ठरवा!” अशा घोषणा घुमत आहेत.

मनोज मोरे हे अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठ कार्यकर्ते असून, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे यावेळी “बाहेरच्यांपेक्षा घरची हवा, घरच्यांवरच विश्वास ठेवा!” अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांतून जोर धरताना दिसत आहे.

पक्षातील जाणकारांचे मत आहे की, जर सौ. धनश्री मनोज पाटील मोरे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली, तर बरबडा गटात भाजपला नवा जोम आणि कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी मिळेल. दुसरीकडे विरोधक मात्र अद्याप उमेदवार ठरविण्याच्या संभ्रमात आहेत.

स्थानिक राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे —

“बरबड्यात यंदा बाहेरच्यांना नाही, स्थानिक धनश्री मोरेलाच संधी!”भाजपसाठी हा गट स्थानिक निष्ठेचा आणि पक्षविस्ताराचा सुवर्णअवसर ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!